मनपा कर्मचाऱ्यांचे आवारात ठिय्या आंदोलन

0

धुळे : धुळे मनपातील कर्मचार्‍यांच्या विविध मागण्या प्रलंबित असून या संदर्भात अनेकदा निवेदन देऊन व चर्चा करुनही प्रश्‍न सुटत नसल्याने या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनपा सफाई कामगारांनी सफाई कामगारांनी प्रियदर्शनी कामगार संघाच्या माध्यमातून आवारात ठिय्या आंदोलन करुन निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, मनपात दोन-दोन महिने पगार होत नसल्याने कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

तर २३ जानेवारी पासून कामबंद आंदोलन
मनपा सफाई कर्मचार्‍यांचा ठिय्या त्यामुळे दरमहा १० तारखेच्या आत कर्मचार्‍यांचा पगार करावा, पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाचा फरक संपूर्ण रोखीने द्यावा,बदली कामगार, रोजंदारी कामगार, म्युनिसिपल फंडातील कामगार आणि कार्यालयीन कर्मचारी यांचे किमान वेतनदर सन २००३ च्या महासभेत मंजूर झाले आहे. मात्र अद्यापही त्याचा फरक मिळालेला नाही. तो रोखीने देण्यात यावा, सफाई कर्मचार्‍यांसाठी देवपूरातील सर्व्हे नं.१२२ची जागा घरकूलसाठी महासभेत मंजूर झाली आहे. त्यावर प्लॉट पाडून ते देण्यात यावे, सफाई
कामगारांना चार राष्ट्रीय सुट्या मंजूर करण्यात आल्या असून सन २०१३ पासून एकही सुटी न दिल्याने या सुट्यांचा पगार देण्यात यावा तसेच सर्व कर्मचार्‍यांना १२०० रु वैद्यकीय भत्ता त्वरीत लागू करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. येत्या ८ दिवसात या मागण्यांची पुर्तता न झाल्यास २३ जानेवारी पासून कामबंद आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. या आंदोलनात प्रियदर्शनी कामगार संघाच्या पदाधिकार्‍यांसह सदस्य सहभागी झाले होते.