मनपा प्रशासन अधिकार्‍यांना कारणे दाखवा

0

जळगाव । महानगर पालिकेचे प्रशासन अधिकारी व्ही. एस. महाजन यांच्या विरोधात गैरशिस्तीच्या वर्तनाबाबत तसेच प्रशासकीय अनियमितेबाबत तक्रारी येत होत्या. या तक्रारींची चौकशी करून प्राथमिक अहवाल सादर करण्याचे जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी यांना आदेश देण्यात आले होते. यानुसार त्यांनी चौकशी पूर्ण करून अहवाल 11 एप्रिल 2017 रोजी सादर केला होता.

खुलासा सादर करण्यासाठी अंतिम नोटीस बजावली
या चौकशी अहवालात वरीष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, न्यायालयाने प्रशासनास आदेश देवूनही माहिती न्यायालयात सादर न करणे, शासकीय कामकाजात टाळाटाळ करणे, महानगर पालिकेची आर्थिक परिस्थिती नसतांना न्यायायलात मनपाची बाजू मांडली नसल्याने अवमान याचिका दखाल करण्यात आलेली आहे. यास सर्वस्वी व्ही. एस. महाजन जबाबदार असल्याचे नमुद करण्यात आले आहे. या अहवालानुसार महाराष्ट्र नागरी सेवा(वर्तणूक ) नियम 1981 कलम 3(1) (2) (3), 2, 1 चा भंग केल्याचे दिसून येत असल्याने त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1981 मधील नियम 10 अन्वये कारवाई का करण्यात येवू नये अशी विचारणा नाशिक विभाग शिक्षण उपसंचालक यांनी केली होती. तसेच महाजन यांना आपला खुलासा 30 मे 2017 पर्यंत सादर करण्याची नोटिस बजावली होती. परंतु, त्यांनी खुलासा सादर न केल्याने त्यांना आपला खुलासा प्रत्यक्ष सादर करण्याची अंतीम नोटीस बजावण्यात आली आहे.