मनपा रुग्णालयात नियमीत आरोग्य तपासणी सुरू!

0

जळगाव- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगावकर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मनपाच्या ६ दवाखान्यात प्राथमिक तपासणी सुरू आहे.

जळगांव शहर महानगरपालिका अंतर्गत १.कै.दादासाहेब भिकमचंद जैन रुग्णालय, शिवाजी नगर, २.कै.चेतनदास मेहता रुग्णालय, सिंधी कॉलनी ३.नानीबाई अग्रवाल दवाखाना, गणेश वाडी ४.म.मो.मुलतानी दवाखाना, मेहरुण ५.प्राथमिक आरोग्य केंद्र पिंप्राळा, हुडको, पिंप्राळा ६.कै.शाहीर अमर शेख दवाखाना, चौघुले प्लॉट, शनिपेठ या ६ दवाखान्यात सकाळी ९ ते १ व संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत नियमित दैनंदिन रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात येत असून आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात येत आहेत. तरी सर्व गरजु रुग्णांनी सदर दवाखान्यांच्या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.

सोशल डिस्टन्स ठेवून खबरदारी बाळगा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वांनी एकमेकांपासून १ मीटर अंतर ठेवावे. दवाखान्यात आल्यानंतर १ मीटर अंतर सोडून प्रत्येकाने रांगेत उभे राहावे. तोंडाला मास्क किंवा रुमाल लावावा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. कोणत्याही ठिकाणी जमाव करून उभे राहू नये असे आवाहन देखील महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.