पनवेल । पनवेल येथील महानगरपालिका प्राथमिक शाळांचे विज्ञान प्रदर्शन शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी भरविण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात 11 शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले असून, त्यांचे प्रकल्प पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवी अशा दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहेत. या प्रदर्शनात घनकचरा व्यवस्थापन, इलेक्ट्रिक जनरेटर, रूम हीटर, वॉटर पंप, विज्ञानातील गमती-जमती, तसेच जीवनावर आधारित अनेक प्रकल्प सादर करण्यात आले आहेत.
मान्यवरांकडून प्रदर्शनाची पाहणी
या वेळी उपमहापौर चारुशीला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती अमर पाटील, आरोग्य, स्वच्छता वैद्यकीय सेवा व रुग्णालय सेवा सभापती डॉ. अरुणकुमार भगत, सार्वजनिक उद्याने, बागा, तलाव व शहर सुशोभीकरण सभापती विकास घरत, महिला व बालकल्याण सभापती दर्शना भोईर, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक व युवा कल्याण सभापती विद्या गायकवाड, नगरसेवक मुकीद काझी, राजेंद्र शर्मा, नगरसेविका मुग्धा लोंढे, कुसुम पाटील, कुसुम म्हात्रे, पुष्पा कुत्तरवडे, आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, उपायुक्त संध्या बावनकुळे, शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी निशा वैदू, तसेच डॉ. आगलावे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. उद्घाटनानंतर मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी केली.