जळगाव– मनपाच्या दुसर्या मजल्यावरील सभागृहात सुरेशदादा जैन यांचे तैलचित्र लावले होते.मात्र घरकुल घोटाळ्यात त्यांना शिक्षा झाल्यानंतर आरटीआय कार्यकर्ता दिपक कुमार गुप्ता यांनी सभागृहातील तैलचित्र काढण्यासाठी आयुक्तांना निवेदन दिले होते.त्यानुसार मंगळवारी तैलचित्र हटविले .
महापालिकेच्या सभागृहात डाव्या बाजूला सरदार वल्लभभाई पटेल यांचा तर तर उजव्या बाजूला सुरेशदादा जैन यांचे लावण्यात आले होते. घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेशदादा जैन यांचे तैलचित्र काढण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ता गुप्ता यांनी आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांना काही दिवसापूर्वी दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती. तसेच ी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान,तैलचित्र लावण्याबाबत कोणताही ठराव झालेला नसल्याने सभागृहातील तैलचित्र हटविले.