ना. गिरीश महाजन यांचा फोन आल्यानंतर तिघांनी माघार घेतली
जळगाव : मनपा स्थायी समिती सभापती निवडीची सभा पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत पार पडली. सभापती पदी ॲड. शुचिता हाडा यांची निवड करण्यात आली.
स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपतर्फे चार जणांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. भगत बालानी, दिलीप पोकळे, राजेंद्र घुगे पाटील यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे ॲड. शुचिता हाडा यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
तसेच महिला बालकल्याण समिती सभापती पदी शोभा बारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.