निवृत्तीसाठी विशेष सभा
जळगाव- महापालिकेच्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांपैकी 8 सदस्य दि.17 रोजी निवृत्त होणार आहेत.त्यासाठी सकाळी 11 वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.चिठ्ठ्या टाकून आठ सदस्य निवृत्त केले जाणार असून याकडे लक्ष लागले आहे.
स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा निवृत्तीसाठी दि.17 रोजी सकाळी 11 वाजता सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयेजित करण्यात आली आहे. दि. 11 सप्टेंबर 2018 रोजी स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यात आली होती. समितीत 16 सदस्यांचा समावेश आहे.यात भाजपचे 12 तर शिवसेनेचे 3 तर एमआयएमचे एक सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे भगत बालाणी, सदाशिवराव ढेकळे, अॅड. सुचिता हाडा, उज्ज्वला बेंडाळे, अॅड. दिलीप पोकळे, प्रवीण कोल्हे, सुनील खडके, प्रतिभा पाटील, चेतन सनकत, सुरेश सोनवणे, मयूर कापसे, जितेंद्र मराठे.शिवसेनेचे 3 नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, नितीन बरडे तर एमआयएमचे रियाज बागवान यांचा समावेश आहे.
सभापतींचा 30 ऑक्टोबरपर्यंत कार्यकाळ
स्थायी समितीचे आठ सदस्य उद्या दि.17 रोजी निवृत्त होत आहेत. स्थायी समितीचे सभापती जितेंद्र मराठे यांचा कार्यकाळ 30 ऑक्टोबरपर्यंत राहणार असून सभापती निवड ही विधानसभा निवडणुकीनंतरच होणार असल्याची शक्यता आहे.