मनपा स्थायी समिती सदस्यांची निवड जाहीर !

0

जळगाव: महानगर पालिकेच्या स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सदस्य निवडीसाठी आज बुधवारी महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभा झाली. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, उपायुक्त अजित मुठे, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. स्थायी समितीतील १६ सदस्यांपैकी ८ सदस्य निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी नवीन ८ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यात भाजपचे ५, शिवसेनेचे २ तर एमआयएम १ सदस्य असे एकूण ८ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्यावतीने नवनाथ दारकुंडे, मुकुंद सोनवणे, राजेंद्र पाटील, प्रतिभा देशमुख, रेश्मा काळे, शिवसेनेतर्फे नितीन लढ्ढा, नितीन बरडे आणि एमआयएमतर्फे सहिदा बी युसुफ शेख यांची निवड करण्यात आली आहे.

महिला बालकल्याण समिती पुनर्गठन
महिला बालकल्याण समितीचे पुनर्गठन करण्यात आले. या समितीतील ९ सदस्य निवृत्त करून नवीन ९ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यात भाजपच्या वतीने कांचन सोनवणे, गायत्री शिंदे, शोभा बारी, मीना सपकाळे, चेतना चौधरी, मीनाक्षी पाटील, शेख हसीना बी शरीफ, तर शिवसेनेच्या शबाना खाटिक, जिजाबाई भापसे यांचा समावेश आहे. दरम्यान नवनियुक्त सदस्यांचा महापौर, उपमहापौर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.