रेल्वे प्रशासनाची मोहिम ; 52 क्वॉर्टर्स बंदोबस्तात जमीनदोस्त
भुसावळ : मनमाड येथील रेल्वे प्रशासनाच्या जागेवर मोडकळीस आलेले 52 क्वॉर्टर्स रेल्वे प्रशासनाने स्थानिक पोलीस प्रशासनास रेल्वे सुरक्षा बलाच्या प्रचंड बंदोबस्तात आज उध्द्वस्त केले. रेल्वेच्या जागेवर नव्याने कर्मचार्यांसाठी क्वॉर्टर्स बांधण्यात येणार आहे. या कारवाईने क्वॉर्टर्समध्ये अनधिकृतरित्या राहणार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.
भुसावळातील वाल्मीक नगरातही हटवले अतिक्रमण
भुसावळ- शहरातील वाल्मिक नगरात राहणार्या रहिवाशांनी स्वयंस्फुर्तीने घराबाहेर केलेले अतिक्रमण गुरुवारी हटवले. काही महिन्यांपुर्वीदेखील अशाच पध्दतीने अतिक्रमण हटवण्यात आले होते. या भागातील नगरसेविका सोनी संतोष बारसे व संतोष बारसे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत रहिवाशांनी अतिक्रमण हटवल्याची माहिती आहे. अतिक्रमण हटवल्याने गटारींची स्वच्छता होणार आहे.