मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग होणारच : आ.गोटे

0

धुळे । धुळेकरांच्या विकासाची लाईफ लाईन ठरू पाहणार्‍या मनमाड-इंदूर रेल्वमार्गाचा पुन्हा खेळखंडोबा झाल्याचे दिसत आहे. मनमाड- इंदूर रेल्वे मार्गासाठी करण्यात आलेल्या चौथ्या सर्व्हेक्षणात परतावा (आरओआर) अकरा टक्क्यावरुन अडीच टक्क्यावर आला आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आमदार अनिल गोटे प्रचंड संतापले आहेत. अडीच टक्क्याचा आरओआर आल्यानंतर आमदार गोटेंनी दिल्ली गाठत केंद्रीय भुपृष्ठवहनमंत्री नितीन गडकरी यांच्यासह रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली. 11 टक्क्यावरुन आरओआर कमी झालाच कसा? गोटेंनी केला आहे. आहे. रेल्वे मार्ग होईलच मात्र, रेल्वेमंत्रालय नव्हे तर इंडियन पोर्ट रेल्वे अ‍ॅण्ड रोडस् कार्पोरेशन या कंपनीमार्फत करण्यात येईल अशी ग्वाही गोटेंनी पत्रकार परिषदेत दिली.

आरओआर 11 टक्के वरुन अडीच टक्के
पत्रकार परिषदेत मनमाड -इंदूरच्या सध्यस्थितीबाबतची माहिती दिली.रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत इंडियन पोर्ट रेल्वेज अ‍ॅन्ड रोड डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनुप अग्रवाल यांनी सदर रेल्वे मार्गाचा नवीन रेट ऑफ रिटर्न म्हणजे गुंतविलेल्या पैशाचा परतावा फक्त अडीच टक्के एवढाच येत असल्याचे सांगितले. यावर रेल्वेमंत्र्यांनी पुन्हा हिशोब करुन अहवाल देण्याचे सांगितले. येत्या 15 दिवसाच्या आमदार गोटे यांनी सांगितलेल्या सर्व मुद्द्यांचा अंतर्भाव माझ्यापुढे ताजा अहवाल सादर करा, असे नितीन गडकरी यांनी हा रेल्वेमार्ग प्रशासनाला दिले आहे.