मनमाड-नांदगाव ताशी 130 किलोमीटर वेगाने धावली जीएम एक्स्प्रेस

0

विभागातील अनेक रेल्वे स्थानकांची केली डी.के.शर्मा यांनी केली पाहणी

भुसावळ (गणेश वाघ) : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के.शर्मा यांनी भुसावळ विभागाच्या दौर्‍यादरम्यान ताशी 130 वेगाने मनमाड-नांदगाव अशी ट्रायल घेतल्याने भविष्यात रेल्वे गाड्यांचा वेग वाढण्याची दाट शक्यता आहे. विभागातील अनेक स्थानकांना त्यांनी सरप्राईज व्हिजीट करीत अनेक बाबींची बारकाईने पाहणी केली. जी.एम.स्पेशल ट्रेनचे शनिवारी सकाळीच मनमाड रेल्वे स्थानकावर आगमन झाले. याप्रसंगी त्यांचे रेल्वे प्रशासनातर्फे स्वागत करण्यात आले.

मनमाड-नांदगाव दरम्यान हायस्पीडची चाचणी
जीएम स्पेशल ट्रेनने शनिवारी मनमाड ते नांदगाव या मार्गावर ताशी 130 वेगाने गाडी चालवत ट्रायल घेतली. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात सध्या रेल्वे ताशी 110 किलोमीटर वेगाने धावतात तर भविष्यात त्या 120 ते 130 किलोमीटर ताशी वेगाने चालवण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. भुसावळ विभाग हा मध्य प्रदेश व विदर्भाला जोडणारा दुवा आहे. भारतीय रेल्वेत भोपाळ ते नवी दिल्ली या मार्गावर शताब्दी 140 तर राजधानी 120 किलोमीटर वेगाने धावते त्यामुळे भविष्यात हा उच्चांक बदलण्याच्या व कमी वेळेत अनेक या गाड्या मुंबईचा पल्ला गाठून रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखद करतील, अशी शक्यता आहे.