मनमाड शहरातील रेल्वे हद्दीतील अतिक्रमण हटवले

0

मनमाड : मनमाड शहरातील रेल्वेच्या जागेवर अनधिकृतपणे करण्यात आलेले बांधकाम रेल्वे प्रशासनाने बंदोबस्तात हटवले. इंजिनिअरींग, विद्युत विभाग आणि सुरक्षा विभाग यांच्या सहकार्याने विशेष मोहिमेत आतापर्यंत 49 जुने व जीर्ण रेल्वे क्वार्टर तोडण्यात आले तसेच 11 आऊट हाऊस व 11 अतिक्रमण हटवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. डीआरएम आर.के.यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली.