शिरपूर । तालुक्यातील अजनाड येथील ग्रामसेवक हेमंत चौधरी यांनी आपल्या कामात कामचूकारपणा तसेच घरकूल योजनेत अपहार या सारख्या विविध योजनेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आल्यामुळे त्यांना दि.15 रोजी येथील पंचायत समिती गटविकास अधिकारी बागूल यांनी निलंबनाचा आदेश दिला.
असे होते आरोप: 2017/18 चे अंदाजपत्रक सादर न करणे, वार्षीक प्रशासन अहवाल सादर न करणे, घरपट्टी,पाणीपट्टी वसूली अहवाल सादर न करणे, ग्रामसभा न घेणे, शौचालयाचे बोगस अनूदान लाभार्थ्यांना वाटप करणे , जैविक विविधता व्यवस्थापन समिती गठीत न करणे, ग्रामपंचायतीचे अभिलेख तपासणी साठी न देणे, पंचायत समिती येथे होणार्या मिटींगाना गैरहजर राहणे, रोजगार हमी योजनेतंर्गत कामे न करणे.
ग्रामस्थांनी केली तक्रार
ग्रामसेवक चौधरी यांनी गावाच्या प्रति कर्तव्य व जबाबदारीचे पालन न करता मनमानी कारभार चालवत असल्याची तक्रार अनेकवेळा अजनाड येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानूसार शिरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडून झालेल्या चौकशीत ग्रामसेवक चौधरी यांनी आपल्या कामात कुचराई केल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईस पात्र ठरवून निलंबीत करण्याचे आदेश पारित करण्यात आला आहे.