भुसावळ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र व समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनांतर्गत अकरा कलमी कार्यक्रम संदर्भात उपविभाग पातळीवर वर्गाचे आयोजन वरणगाव येथील भाग्यलक्ष्मी लॉन येथे करण्यात आले. मंचावर विभागीय समन्वयक मोरे, उपविभागीय प्रांताधिकारी चिंचकर, भुसावळच्या तहसिलदार मिनाक्षी राठोड, मुक्ताईननगर तहसिलदार जितेंद्र कुवर, बोदवड तहसिलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी मावळे, आरएफओ आदी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. या वर्गात 11 कलमी योजनेत अहिल्यादेवी सिंचन विहीर, अमृतकुंभ शेततळे, अंकुर रोपवाटीका, भू संजीवनी नात्रेय कंपोस्टिंग, निर्मल शोषखड्डा, भू संजीवनी कंपोस्टींग, समृध्द गाव योजना, निर्मल शौचालय, समृध्द गाव तलाव, कल्पवृक्ष फळ लागवड या योजनांची माहिती देण्यात आली.