मनवेलच्या वृद्धेचा मृत्यू ; रीक्षा चालकाविरुद्ध गुन्हा

0

यावल:- नातेवाईकाच्या अंत्यविधीनंतर साकळी बसस्थानकावर उतरलेल्या मनवेल येथील शोभाबाई नीळकंठ पाटील (65, मनवेल) यांना मालवाहू रीक्षाने धडक दिल्याने त्यांचा शनिवारी मृत्यू ओढवला होता. या प्रकरणी रीक्षा चालक घनश्याम भागवत नेमाडे (फैजपूर) विरुद्ध यावल पोलिसात मुरलीधर नीळकंठ पाटील (46, मनवेल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शोभाबाई पाटील यांच्यासह अन्य दोन महिला भोकर, ता.जळगाव येथे नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने गेल्या होत्या. शनिवादी दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्या साकळी बसस्थानकावर बसमधून उतरल्या असता रस्ता ओलांडत असताना मुरलीधर पाटील याने भरधाव रीक्षाची धडक दिल्याने त्यांचा दूरवर फेकल्या जावून मृत्यू झाला होता. रविवारी सकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.