मनवेलच्या शेतकर्‍याचा विद्युत शॉक लागल्याने मृत्यू

0

यावल- तालुक्यातील मनवेल येथील राजेंद्र शांताराम पाटील (45, मनवेल) यांचा शेतात विद्युत शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, 17 जुलै दुपारी 3.30 वाजेपूर्वी घडली. मनवेल शिवारातील गट क्रमांक सहामधील
इलेक्ट्रीक पोलच्या तणावाजवळ राजेंद्र पाटील यांना विद्युत शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी रवींद्र शालिग्राम पाटील (49, रा.मनवेल) यांनी यावल पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक संजीव चौधरी करीत आहेत.