मनवेल गावातील भाजी विक्रेता तरुणाने घरात गळफास घेत संपवले आपले जिवन पोलिसात घटनेची नोंद

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील मनवेल गावात राहणाऱ्या एका विवाहीत तरूणाने संतापाच्या भरात आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली असुन,पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , नितिन अमृत कोळी, वय ३१वर्ष व्यवसाय भाजीपाला विक्रेता राहणार मनवेल तालुका यावल याने आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या पुर्वी मनवेल येथे आपल्या राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे . याबाबत मयताचे काका शांताराम पंढरीनाथ कोळी यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .मयत नितिन कोळी याच्या मृतदेहाचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी शवविच्छेदन केले . तरूणाने आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ठ होवु शकले नाही . घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .