यावल- धुनीवाले दादाजी दरबार मनवेलतर्फे सालाबादाप्रमाणे मनवेल ते खंडवा पायी दिंडी शनिवार, 21 रोज सकाळी सात वाजता रवाना होणार आहे. तत्पूर्वी पालखीचे पूजन दादाजी दरबारात होईल व गावात मिरवणूक काढून दिंडी खंडव्याकडे प्रस्थान करणार आहेत. 21 रोजी यावल येथील जगन्नाथ पाटील यांच्याकडे भोजनाचा कार्यक्रम होईल तर नेवे मंगल कार्यालयात दिंडीचा मुक्काम असेल. 22 जुलै रोजी सावदा येथे गजानन पाटील यांंच्याकडे जेवण व मुक्काम तर 23 जुलै रोजी निरुळ येथे शिवाजी पाटील यांंच्याकडे जेवण व मुक्काम, 24 जुलै रोजी अशीररगड (म.प्र.) येथील रुपेश्वर महादेव मंदिर व 25 जुलै रोजी रुस्तंणपुर (म.प्र.) येथे मुक्काम व 26 जुलै रोजी खंडवा येथे दिंडी दाखल होईल. ज्या भाविकांना पायी दिंडीत सहभागी व्हायचे आहे त्यांनी संतोष (तात्या) पाटील, गजानन पाटील, सुभाष अशोक पाटील, पन्नालाल पाटील, मनीलाल पाटील, सोपान पाटील, योगराज पाटील, किशोर पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन धुनीवाले दादाजी दरबार मनवेलतर्फे करण्यात आले आहे.