मनसेची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर

0

पिंपरी-चिंचवड :- पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केली आहे. दहा जणांच्या कार्यकारिणीमध्ये एक शहराध्यक्ष आणि विधानसभा मतदारसंघनिहाय तीन उपशहराध्यक्ष असणार असून त्या सर्वांचा कार्यकाल एका वर्षाचा असणार आहे. यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहर मनसेला दोन शहराध्यक्ष होते. परंतु राज ठाकरे यांनी एकच शहराध्यक्ष ठेवला आहे. दहा दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहराच्या अध्यक्षपदी सचिन चिखले यांची एकट्याची फेरनियुक्ती केली होती. त्यानंतर आता दहा जणांची कार्यकारिणी जाहीर केली आहे.

यांची आहेत कार्यकारणीत नावे
सचिन चिखले (शहराध्यक्ष), अंकुश तापकीर (उपशहराध्यक्ष, भोसरी विधानसभा), राजू साळवे (उपशहराध्यक्ष, चिंचवड विधानसभा), बाळा दानवले (उपशहराध्यक्ष, पिंपरी विधानसभा), विशाल मानकरी (विभाग अध्यक्ष, भोसरी विधानसभा), मयूर चिंचवडे (विभाग अध्यक्ष, चिंचवड विधानसभा), शाम जगताप (विभाग अध्यक्ष, चिंचवड विधानसभा), संजय यादव (विभाग अध्यक्ष, पिंपरी विधानसभा), दत्ता देवतरासे (विभाग अध्यक्ष, पिंपरी विधानसभा) आणि रुपेश पटेकर (शहर सचिव) यांचा कार्यकारिणीत समावेश आहे. या सर्वांची नेमणूक एक वर्षाच्या कालावधीसाठी आहे.