पिंपरी-चिंचवड : पावसाला सुरुवात होताच पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावर सर्वत्र खड्डे- खड्डेच पडले आहेत. विविध भागातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. शहर खड्डे मुक्त करण्यासाठी मनसेने गुरुवारी महापालिका आयुक्त दालनसमोर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
…अधिकार्यांना खड्यात बसवणार
स्थापत्य विभागाकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व रस्ते दुरुस्त होणे अपेक्षित होते. परंतु आपल्याकडून कोणत्याही प्रकरणाचे काम न झाल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्याचा परिणाम म्हणजे शहरात अनेक ठिकाणी छोटे मोठे अपघात होत आहेत. शहरात पाऊसामुळे मोठ मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अनेक अपघात झाले आहेत. नागरिकांनी कर ही भरायचा आणी कर भरून ही स्वताचा जिव ही द्यायचा ही कोणती पध्दत आहे. येत्या दहा दिवसांत शहरातील खड्डे बुजविण्यात यावेत. अन्यथा संबंधित अधिकार्यांना खड्यात बसवून आंदोलन करण्यात येईल.