पुणे । महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांच्या कपातीचा निषेध नोंदविण्यासाठी मनसेचे नगरसेवक गुरुवारी पालिकेच्या मुख्यसभेत सुरक्षा रक्षकाच्या वेशभूषेत हजर झाले होते. महापालिकेच्या अखत्यारीतील पुतळे यांच्या सुरक्षेची जबाबदारी पालिकेच्या सुरक्षा विभागाची आहे. या विभागात कंत्राटी पद्धतीने सुमारे 1700 ते 1800 सुरक्षा रक्षक काम करतात. मात्र ही संख्या अतिरिक्त असल्याने 900 कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिका प्रशासनाने फक्त 900 सुरक्षारक्षकांची निविदा मान्य केली आहे. त्यामुळे अतिरिक्त सुरक्षारक्षकांचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला. या विरोधात मनसेने गुरुवारी आंदोलन करीत पालिकेच्या मुख्यसभेत सुरक्षा रक्षकाच्या वेशभूषेत प्रवेश केला.
काळ्या टोप्या घालून निषेध
नोटबंदीला वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने बुधवारी (दि. 8) विरोधीपक्षाने भाजपच्या विरोधात रान पेटवून जनआक्रोश आंदोलन केले. गुरुवारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापालिका मुख्यसभेमध्ये काळ्या टोप्या परिधान करून मुख्यसभेला हजेरी लावत नोटबंदीचा निषेध नोंदवला.