मनसेचे वरिष्ठ नेते आज शहर दौर्‍यावर

0

पिंपरी : पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज्यभर दौरा करत आहेत. त्यानुसार नेते बाळा नांदगावकर बुधवारी पिंपरी-चिंचवड शहरात येणार असून पक्षाच्या पदाधिकार्‍यांची भेट घेणार आहेत. पक्ष संघटनावाढीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली. पिंपरी, मोरवाडी येथे कार्यकर्त्यांची बैठक होईल, नांदगावकर यांच्यासोबत अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, जिल्हाध्यक्ष समीर ठिगळे, रविंद्र गारुडकर उपस्थित राहणार आहेत.

पक्ष बळकटीसाठीच दौरे
राज्यातही मनसेची बिकट अवस्था झाली आहे. पक्ष संघटना खिळखिळे झाले असून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पक्षाचे संख्याबळ देखील घटले आहे. 2012 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत मनसेचे चार नगरसेवक निवडून आले होते. परंतु, 2017 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत मनसेचे एकमेव उमेदवार निवडून आला आहे. शहरातील पक्षाची ताकद कमी झाली आहे. पक्ष संघटना पुन्हा बळकट करण्यासाठी मनसेच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी दौरे सुरु केले आहेत.