मनसेचे शिशिर शिंदे येत्या 19 तारखेला करणार शिवसेनेत प्रवेश

0

मुंबई । मनसे नेते आणि माजी आमदार शिशीर शिंदे हे मनसेला जय महाराष्ट्र करीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.त्यांच्या ‘स्वगृही’ परतण्याचा मुहूर्त निश्‍चित झाला असून, येत्या 19 तारखेला शिवसेनेच्या वर्धापनदिनी ते शिवसेनेत प्रवेश करतील. शिंदेंच्या या निर्णयामुळे मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.गेल्याच महिन्यात बांद्रा कुर्ला कॉप्लेक्स येथील एका लग्नसमारंभात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिशिर शिंदे यांची भेट झाली होती.

या भेटी दरम्यान ठाकरे शिंदे यांच्यात याबाबत चर्चा झाली होती. आता येत्या 19 तारखेला शिवसेनेच्या वर्धापनदिनी शिशिर शिंदे हे शिवसेनेत प्रवेश करतील. आ. प्रवीण दरेकर, आ.राम कदम यांच्यानंतर शिंदे हे मनसेला जय महाराष्ट्र करीत आहेत. यापूर्वीच मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.मनसेला आणखी एक मोठे खिंडार पडेल अशी चर्चा आहे.