मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली राजकीय भूमिका काहीशी बदलविली आहे. उद्या मनसेचा मेळावा होत असून यात ते पक्षाचा नवीन ध्वज जाहीर करणार आहे. मनसेने नवीन झेंडा निवडणूक आयोगाला पाठविले आहे. मनसेचा नवीन झेंडा समोर आला असून यावर मराठा क्रांती मोर्च्याने आक्षेप घेतले आहे. याविरोधात मराठा क्रांती मोर्चा कोर्टात जाणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे वकील विनोद पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. नवीन झेंड्यात भगवा रंग असून यात शिवरायांची राजमुद्रा असणार आहे. यावर मराठा क्रांती मोर्चाने आक्षेप घेतले आहे. शिवरायांच्या राजमुद्राचा हा अपमान आहे असे सांगण्यात येत आहे.