मनसेच्या दापोडी विभागप्रमुखाची नियुक्ती

0

पिंपरी-पिंपरी-चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पिंपरी विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक ३० मधील दापोडीतील विभागप्रमुख, उपविभागप्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मनसेचे शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले यांनी नियुक्त्या घोषित केल्या.

उपविभाग प्रमुखपदी अलेक्सझांडर अप्पा मोझेस, दिलीप शमुवेल ठोंबरे, प्रभाग अध्यक्षपदी सुधिर मधुकर जम, उपाध्यक्षपदी अनिल श्रीकृष्ण गायकवाड, कार्याध्यक्षपदी सुशील महिंद्र सोनकांबळे, वार्ड अध्यक्षपदी सागर रामदास भोकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसेने पक्ष संघटना बांधणीवर भर दिला आहे. नुकतीचे सचिन चिखले यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. चिखले यांनी संघटना बांधणीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. प्रभागनिहाय अध्यक्षांची नेमणूक केली जात आहे. प्रभागात संघटना मजबूत केली जात आहे.