पिंपरी चिंचवड : राजकीय पक्षाच्या झेंड्यावर शिवराजमुद्रेचा वापर करणे अत्यंत चुकीचे आहे. राजकीय पक्षाच्या अनेक कार्यक्रमात, आंदोलनात या झेंड्याचा मोठ्या प्रमाणत वापर होत असतो. त्यावेळी अनेक वेळा उत्साही कार्यकर्त्यांकडून शिवमुद्रा असणार्या झेंड्याचा गैरवापर होऊ शकतो. या शिवमुद्रेचा अवमान होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या नव्या झेंड्यावर शिवराजमुद्रेचा वापर करू नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. यासंदर्भात भापकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लेखी पत्र दिले आहे.
शिवराजमुद्रेला अनन्य साधारण महत्त्व…