मनसेच्या नव्या दमाच्या टीमची घोषणा

0
दीपक पायगुडे, अबिजीत पानसे मनसेचे नेते
मुंबई :- मरगळलेल्या अवस्थेत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता नव्या जोमाने पुढे येण्याचा निर्धार केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढच्या पाच वर्षांसाठी पक्षाच्या दहा नेत्यांची नावे जाहीर केली असून यात दीपक पायगुडे आणि अभिजीत पानसे यांचा समावेश आहे.
पक्षाचे अन्य नेते पुढीलप्रमाणे- बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संजय चित्रे, अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, जयप्रकाश बाविस्कर आणि राजू पाटील. याचबरोबर पक्षाचे १२ सरचिटणिसही जाहीर करण्यात आले आहेत. मनोज चव्हाण, आदित्य शिरोडकर, परशुराम उपरकर, हेमंत गडकरी, बाबा जाधवराव, प्रकाश बोईर, राजेंद्र शिरोडकर, राजीव चौगुले, संदीप देशपांडे, सालिनी ठाकरे, रीटा गुप्ता आणि अशोक मुर्तडक यांचा यात समावेश आहे.