राज ठाकरे यांनी केली कार्यकारिणी जाहीर
पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी नगरसेवक सचिन चिखले यांची फेरनिवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर नव्या कार्यकारिणीची देखील घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत केली. शहर मनसेच्या सर्व पदाधिकार्यांची राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला मनसे नेते अनिल शिदोरे, पिंपरी चिंचवड शहर प्रभारी किशोर शिंदे, गणेश सातपुते, रणजित शिरोळे हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाची नव्याने नियुक्ती करण्यात आली. यात नगरसेवक सचिन चिखले यांची शहराध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरामध्ये नव्याने महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना हि विंग चालु करण्यात आली. या विंगच्या शहराध्यक्षपदी रुपेश बाजीराव पटेकर यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्व नियुक्तीचे पत्र राज ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आले.
शहर मनसेची कार्यकारिणी ः
सचिन चिखले – शहराध्यक्ष, विशाल मानकरी ः उपशहराध्यक्ष – भोसरी विधानसभा, बाळा दानवले ः उपशहराध्यक्ष – पिंपरी विधानसभा, राजु सावळे ः उपशहराध्यक्ष – चिंचवड विधानसभा, राहुल जाधव ः सचिव – पिं.चिं.शहर, रुपेश पटेकर ः सचिव – पिं.चिं.शहर, अंकुश तापकिर ः विभाग अध्यक्ष – भोसरी विधानसभा, दत्ता देवतरासे ः विभाग अध्यक्ष – पिंपरी विधानसभा, मयुर चिंचवडे ः विभाग अध्यक्ष – चिंचवड विधानसभा.