अडावद । सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरु आहे. समाज बांधवातर्फे समाजान काळात रोजा पाळण्यात येत असतो. रविवारी 18 रोजी चोपडा तालुक्यातील अडावद येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अँग्लो उर्दू शाळेत ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. मनसेच्या अडावद शाखेने रोजादारांसाठी ईफ्तार पार्टीचे आयोजन केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक जयपाल हिरे होते. हाजी फजल शेठ, हाजी पीरु शेठ, वजाहतअली काझी, श्रीकांत दहाड, लायकअली काझी, वनश्री दशरथ पाटील आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवातीस वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी पोलीस कॉस्टेंबल संदीप चतुर, शकीलोद्दीन शेख, जावेद खान, हर्षद खान, फारुक शहा, जहांगीर पठाण, इकबाल खान, छोटु शेटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनसेचे अडावद शहर अध्यक्ष विरेंद्र बोरसे, उमेश बारी, आशिष तडवी, हेमंत नेवे, निखील खंबायत, मंगेश पाटील, भूषण पाटील, हेमंत पाटील, रुपेश महाजन, भूषण चव्हाण, प्रशांत शेटे, दादु कोळी, भूषण लोहारसह आदींनी परिश्रम घेतले.