नवी मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई मनसेतर्फे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण नवी मुंबईत विविध विभागांमध्ये सकाळपासून वृक्षारोपण, स्वस्त दरात पेट्रोल, सफाई कामगारांचा सत्कार, रक्तदान शिबिर, दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आरोग्य तपासणी शिबिर, नागरिकांसाठी वॉर्ड कार्यालयात तक्रार पेटीचे अनावरण, नागरिकांसाठी सूचना फलकाचे अनावरण या व असे अनेक उपक्रम नवी मुंबईतील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राबवले.
सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नेरूळ येथील इंडियन ऑइल पेट्रोलपंपावर सर्व दुचाकीस्वारांसाठी 4 रु. स्वस्त दराने पेट्रोल मनसेच्या नेरूळ, सीवूड्स व बेलापूर विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आले होते. यावेळी शेकडो दुचाकीस्वारांनी या उपक्रमाचा लाभ घेतल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मनसेच्या कोपरखैरणे विभागातर्फे सकाळी सात वाजता मनपा सफाई कामगारांचा त्यांच्या कार्यासाठी प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच कोपरखैरणे विभागातर्फे सकाळी 10 ते 5 ये वेळेत रक्तदान शिबिराचेदेखील आयोजन करण्यात आले होते, तर मनसेच्या नेरूळ विभागा तर्फे वॉर्ड ऑफिसमध्ये नागरिकांसाठी तक्रार पेटीचे अनावरण करण्यात आले व त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम डी.वाय.पाटील कॉलेजसमोरील मोकळ्या जागेत करण्यात आला. ऐरोली सेक्टर-4 येथे संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मनसेच्या ऐरोली विभागातर्फे करण्यात आले होते तसेच दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारदेखील करण्यात आला. कोपरखैरणे येथे मनसे तर्फे नागरिकांसाठी सूचना फलकाचे अनावरण करण्यात आले.
या सर्व सामाजिक उपक्रमांचे आयोजन शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, शहर सचिव संदीप गलुगडे, अप्पासाहेब कोठुळे, अभिजीत देसाई, अमोल आयवळे, डॉ. आरती धुमाळ, श्रीकांत माने, सविनय म्हात्रे, नितीन खानविलकर, संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, प्रसाद घोरपडे, निखील गावडे, विश्वनाथ दळवी, संतोष जाधव, संजय सुतार, रुपेश कदम, शरद डीगे, विनय कांबळे, नितीन नाईक, भालचंद्र माने, सचिन कदम, दत्तात्रय तोडकर, सुधीर पाटील, सुहास मिंडे, विशाल भिलारे, महेश कदम, सागर मांडे, निखिल थोरात, मनीषसिंग राजपूत, चंद्रकांत डांगे, घनश्याम चौधरी, उमेश म्हानवर, शशिकांत साळुंखे, सखराम संकपाळ, तुषार कचरे, विराट शृंगारे, देवा प्रसाद, विनायक पिंगळे व नवी मुंबई .
दुचाकी मोटारसायकल स्वारांना 4 रु. स्वस्त दराने पेट्रोल उपलब्ध
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, मराठी हृदयसम्राट राज ठाकरे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त पोलादपूर येथे दुचाकी मोटारसायकल स्वारांना 4 रु. स्वस्त दराने पेट्रोल उपलब्ध करण्यात आले. महाड आणि कापडे बुद्रुक या ठिकाणीदेखील स्वस्त झाल्याने पेट्रोल विक्री करून पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी मनसे दक्षिण जिल्हा उपअध्यक्ष चेतनदादा उतेकर, शहर अध्यक्ष दर्पणराव दरेकर, तालुका उपाध्यक्ष गोविंद उतेकर, आशिष कुमठेकर, अमर नगरकर, दुर्वा दरेकर, मनविसे जिल्हा उपअध्यक्ष इरफान धामणकर, महेश निकम, विकास गोपाळ, प्रवीण पांडे, विकास गोपाळ, सुमीत जिमन, आदेश गायकवाड,बाबू दाभेकर, तुषार निकम,ओंकार मोहिरे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
राज ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलादपूर ग्रामीण रुग्णालय तसेच पितळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी मनसेतर्फे गरजू रुग्णांना मोफत जेवणाचा डबा देण्याचा मनोदयही शहराध्यक्ष दर्पण दरेकर यांनी व्यक्त केला.प्रारंभी मनसैनिकांनी श्रीदेव काळभैरवनाथ चरणी 11 नारळाचे तोरण अर्पण करून राज ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली, तर पक्ष वाढीसाठी आम्ही सर्वजन जोमाने कामाला लागू अशी शपथ ही तरुणांनी घेतली. पोलादपूर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संपर्क कार्यालयांमध्ये दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या आणि प्रवेशाच्या वाटा समजून घेण्यासाठी होत मोफत ऑनलाइन सर्फींगची सुविधा करण्यात आली आहे.
पोलादपूर तालुका मनसेचा उपक्रम
पोलादपूर शहर व तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसेअध्यक्ष, मराठी हृदयसम्राट राज ठाकरे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त पोलादपूर आणि कापडे येथे दुचाकी मोटारसायकल स्ज्ञाारांना 4 रु. स्वस्त दराने पेट्रोल उपलब्ध करण्यात आले. महाड आणि कापडे बुद्रुक या ठिकाणीदेखील स्वस्त झाल्याने पेट्रोल किंमत कमी करून पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यात आला.
याप्रसंगी मनसे दक्षिण जिल्हा उपअध्यक्ष चेतनदादा उतेकर, शहर अध्यक्ष दर्पण दरेकर, तालुका अध्यक्ष रूपेश सकपाळ, तालुका उपाध्यक्ष गोज्ञिांद उतेकर, आशिष कुमठेकर, अमर नगरकर, सौ.दूर्वा दरेकर, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष इरफान धामणकर, महेश निकम, आशिष जाधव, नीळकंठ साने, नरेश सकपाळ, प्रज्ञिाण पांडे, प्रकाश सकपाळ, सुमीत जिमन, आदेश गायकवाड, बाबू दाभेकर, तुषार निकम, ओंकार मोहिरे ज्ञा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलादपूर ग्रामीण रुग्णालय तसेच पितळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी मनसेतर्फे गरजू रुग्णांना मोफत जेवणाचा डबा देण्याचा मनोदयही शहराध्यक्ष दर्पण दरेकर यांनी ज्ञयक्त केला. पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.भाग्यरेखा पाटील यांनी सर्व मनसैनिकांना धन्यवाद देऊन यापुढेही वेळोवेळी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.प्रारंभी मनसैनिकांनी श्रीदेव काळभैरवनाथ चरणी 11 नारळाचे तोरण अर्पण करून राज ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.