मनसे उपाध्यक्ष शरद सावंत यांचे निधन

0
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष शरद सावंत (वय 54) यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. शरद सावंत यांना मधुमेहाच्या उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. राज ठाकरे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वप्रथम सावंत यांनी शिवसेनेला सोडचिट्टी दिली होती. मनसेच्या सर्वच आंदोलनात सावंत यांचा सक्रीय सहभाग राहिला होता. मनसेच्या पहिल्या फळीचे नेते म्हणून सावंत यांची ओळख होती.  सावंत यांच्या निधनाने मनसेची मोठी हानी झाली आहे. त्यांची उणीव पक्षाला आणि कार्यकर्त्यांना नेहमीच भासेल अशा शब्दात पक्षाचे प्रवक्ते संदीप देशपांडे दु:ख व्यक्त केले आहे.