मनसे महिला शहराध्यक्षा रुपाली ठोंबरे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

0

पुणे-घरात घुसून महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी आणि धमकावल्याप्रकरणी माजी नगरसेविका आणि मनसेच्या महिला शहराध्यक्षा रुपाली ठोंबरे यांच्यासह पाच जणांवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दीपा करमरकर यांनी फिर्याद दिली आहे. रुपाली ठोंबरे यांच्यासह सोनाली भारद्वाज, आशा पाटील, मोनिका कुटे, स्नेहल निकम आणि रुपेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पानमळा परिसरातील एका इमारतीत फिर्यादी दीपा करमरकर वास्तव्यास आहेत.गुरुवारी (21 जून) रुपाली पाटील यांनी दीपा करमरकर यांच्या घरात प्रवेश केला आणि त्यांना शिवीगाळ करून आणि धमकी दिली. फोन करून इतरांना बोलावून घेतले आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दत्तवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.