मनसे महिला शहराध्यक्ष रुपाली ठोंबरे यांच्यासह पंधरा जणांवर गुन्हा दाखल

0

पुणे : शुक्रवार पेठेत दोन गटात झालेल्या वादावादीतून झालेल्या गोळीबारानंतर दहशत निर्माण केल्याप्रकरणी मनसेच्या माजी नगरसेविका तसेच मनसेच्या महिला शहराध्यक्षा रूपाली ठोंबरे यांच्यासह पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी भरदिवसा गोळीबार झाल्याने शहराच्या मध्यभागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मनीषा धुमाळ (शुक्रवार पेठ) यांनी यासंदर्भात खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दंगल, जीवे मारण्याची धमकी देणे, महाराष्ट्र पोलीस कायद्यााअंतर्गत माजी नगरसेविका रूपाली पाटील, प्रियांका पाटील, पाटील यांचा मोटारचालक, अनुजा पाटील यांच्यासह पंधराजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक व्ही. डी. केसरकर तपास करत आहेत.