मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढविणार असून येत्या ५ ऑक्टोंबरपासून आपण प्रचाराला सुरुवात करणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. थोड्या वेळासाठी ते माध्यमांसमोर आले होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. ५ ऑक्टोंबरला माझी पहिली सभा होणार आहे, त्यात मी सगळे काही सांगणार आहे असे राज ठाकरे यांनी सांगितले.
मंत्रालयात विष घेऊन आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटीलांचा मनसेत प्रवेश केला आहे. ते धुळ्यातून निवडणूक लढविणार आहे. यावेळी अनेकांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे.