मनातली आठवण…

0

पाऊस…कधी रिमझिम.. कधी धो धो.. कधी पिर पिर कधी संततधार आठवण जशी आठवते, तसं तसा ऋतू उलघडतो.. लहानपणी च्या आठवणी जशा कोवळ्या आणि तेजस्वी आठवतात.. अगदी तसाच आठवतो तो त्यावेळी सरणारा ऋतू..असे सरणारे आणि आठवणी सावरणारे ऋतु एखाद्याला सुखावून जातात.. एखाद्याला अनुभव देतात.. एखाद्याला खूप काही शिकवून जातात.. तर काहींना शिकवायला भाग पाडतात.असंख्य आठवणी कधीच एकट्या येत नाहीत. सोबतीला घेऊन येतात तो त्यावेळी सरणारा ऋतू आणि म्हणूनच की काय एखाद्या ऋतूचे आवडणे नावडणे हे त्यावेळी घडलेले प्रसंग आणि जुळलेल्या आठवणींवर अवलंबून असाव्यात. जस श्रावणसरींमध्ये झालेलं प्रेम आयुष्यात प्रत्येक पावसाळ्यात प्रत्येक श्रावणात आठवेल तसेच एखाद्याला मुसळधार पावसात झालेल्या अपघाताच्या कडू आठवणी आठवतील कोणाला थंडी गुलाबी आठवेल. कोणाला झोंबणारी आठवेल..ऋतू जातात.. फिरून पुन्हा येतात. अशी ही ऋतुचक्रे माणसाला खूप काही शिकवून जातात.

प्रत्येक ऋतू मध्ये वाईट आणि दुःखद आठवणीच उगाळत बसायचं की आनंदाचे काही क्षण व्यतीत करून तो ऋतू सुखदआठवणींचा बनावायचा हे ज्याच्या त्याच्या हातात असतं. कारण आयुष्याच्या सरतेशेवटी उसळते ती फक्त आठवणींची लाट ह्या अथांग लाटेमध्ये दुःखाचा गढूळपणा आणि पश्चाताप कोणालाही नको असतो  पण मग आयुष्यभर माणूस त्यासाठी प्रयत्न करतो का? आयुष्यात येणारे ऋतू, आणि आठवणी एक असं समीकरण आहे, ज्याला समजलं तो सुखी झाला.

“दिवस निघून जातात..ऋतू सरतात.. राहतात फक्त आठवणी..!!”

                                                                                                                                                                                                        -अबोली सूर्यवंशी-जाधव