जळगाव । जिल्हा मनियार बिरादरीची 17वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष फारुख शेख यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार संघात झाली. जळगाव, भुसावळ, सावदा, फैजपूर, यावल, रावेर, चोपडा, अमळनेर, भडगाव, चाळीसगाव, नशिराबाद, अडावद, रसलपूर, धरणगाव, जामनेर, कासोदा, एरंडोल, पारोळा येथील 177 सभासदांची उपस्थिती होती. मागील सभेचे इतिवृत्त मंजुरी, वार्षिक अहवाल व हिशोबाला मान्यता देण्यात आली. 2017-18 च्या अंदाजपत्रकासह ऑडीटर खैरनार अँड खैरनार यांची निवड करण्यात आली,
जिल्हाभरातून मान्यवरांची उपस्थिती
बिरादरीच्या खुल्या भूखंडाचा विकास करण्याबाबत सर्व संमती होवून फारुख शेख यांना संपुर्ण हक्क देण्यात आले, बिरादरीचे जिल्हा व राज्य पातळीवर अधिवेशन घेण्याचे आयत्यावेळेवरील विषयात संमत झाले तर मनियार बिरादरीला भटक्या जातीत समाविष्ट करण्याचे सरकारला निवेदन देण्याचे ठरले. वार्षिक सभेत अडावदचे शब्बीर शेख, नशिराबादचे मुस्तफा शेख, मुक्ताईनगरचे हकीम चौधरी व कलीम शेख, साकळीचे असलम शेख, पाचोर्याचे इकबाल शेख व जमील सौदागर, कासोद्याचे हाजी लतीफ, यावलचे अ.हाफीज, पारोळ्याचे सै.जावेद, भडगावचे शेख दगडू, भुसावळचे साबीर शेख, एरंडोलचे सै.मुश्ताक, नशिराबादचे सादीक अहेमद, चोप÷ड्याचे शे. मुसा व हकीम शेख, अमळनेरचे शे. मुश्ताक, हुसैन सैय्यद, पाळधीचे शेख गुलाब, मेहरुणचे सै. इकबाल, एम.इकबाल, इकबाल वजीर, शिरसोलीचे शेख इब्राहीम यांनी चर्चेत सहभाग घेतला.