जळगाव । एरंडोल येथील रहिवासी सै. हुसेन फारुक यांचा मुलगा सैय्यद जाकीर व जळगाव येथील रहिवासी सै. यासीन वजीर यांची मुलगी नामे शहेनाज बानो यांचा अनोखा विवाह पार पडला. निकाल झाल्यावर वधूकडे फक्त वराकडील पाच मंडळी व वधूकडील 15 असे 20 लोकांना बिरादरीने स्नेह भोजन तसेच वधूला काही भेट वस्तू देवून एरंडोलला रवाना केले. बिरादरीने अथवा मनियार वाड्यातील सर्व लोकांनी या अत्यंत गरीब असलेल्या ‘वधू’ चे निकाह लावून कोणीही निकाह च्या पंगतीत न जेवता आपआपल्या घरी जेवण केले व ‘बिरादरी’ देवून शहेनाजला रवाना केले. मनियार बिरादरीने आयोजित केलेला हा अनोखा निकाह शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
फक्त आई-वडिलांसह दोन साक्षिदार
एरंडोल येथुन सै. जाकीर हे फक्त आई-वडिलांसह दोन साक्षिदार शेख यासीन व सलीम शेख सह जळगावातील मनियार वाड्यात आले. मनियार वाड्यातील मनियार बिरादरीचे सर्व वृध्द, तरुण व पदाधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले. सकाळी 11.30 वाजता सुन्नी जामा मसजिद, भिलपुरा, नियामत पुरा येथे सुन्नी मसजिदचे इमाम जाकीर रजा यांनी खुतब-ए-निकाह पठण करुन वधुने 7786/- रुपयांमध्ये मेहर मध्ये बांधुन निकाल ला संमती दिली व वधूने त्यावर ‘कबुल है,’ ‘कबुल है’ म्हणत हा अनोखा विवाह झाला.