भुसावळ : फैजपूर येथून मनुदेवी जाणारी रिक्षा हंबर्डीनजीक उलटल्याने झालेल्या अपघातात फैजपूर शहरातील मधुकर इच्छाराम सोनवणे (वय 78) हे वृद्ध जागीच ठार झाले तर चार प्रवास जखमी झाले. हा अपघात हंबर्डी गावाजवळ शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास झाला.
फैजपूर येथून प्रवासी अॅपे रिक्षा (एम.एच.19 बी.जे.0863) चालक हेमंत पंडित नेहते (हंबर्डी) हे घेऊन निघाले असताना हंबर्डी गावाजवळ भरधाव रीक्षा उलटल्याने सोनवणे हे ठार झाले तर तक्रारदार रवींद्र मधुकर सोनवणे (52, देवीवाडा, फैजपूर) यांच्यासह कल्पनाबाई रवींद्र सोनवणे, सरस्वताबाई मधुकर सोनवणे, शुभम रवींद्र सोनवणे (देवीवाडा, फैजपूर) हे जखमी झाले. रवींद्र सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार आरोपी चालक हेमंत नेहतेविरुद्ध फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मयत सोनवणे यांच्या मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. फैजपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. उपनिरीक्षक आधार निकुंभे अधिक तपास करीत आहेत.