मनूर बुद्रुक् पोलिस पाटील यांनी करोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी दिली पाच हजारांची मदत

0

बोदवड : तालुक्यातील मनूर बुद्रुक् येथे ग्रामस्तरीय करोना जनजागृती समितीच्या माध्यमातून उपाययोजना सुरू आहेत. त्यात औषध फवारणी, जनजागृती, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांच्याद्वारे बाहेरून आलेल लोकांच्या घरी जाऊन चौकशी, अंगणवाडी सेविकांमार्फत बालकांच्या कटुंबांची चौकशी, या सारख्या उपाययोजना सुरू आहेत. यात स्वतः केवळ सहभाग न ठेवता या उपाययोजनेकामी गावचे पोलिस पाटील रवींद्र खेलवाडे यांनी रोख पाच हजाराची मदत आढावा बैठकीत समितीचे प्रभारी अध्यक्ष महेंद्र पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. गावात सुरू असलेल्या नियमित फवारणीसाठी औषध मजुरी या साठी हा निधी वापरला जाईल, असे समितीतर्फे जाहीर करण्यात आले.