मनेरगावर ड्रोनने घेतलेल्या छायाचित्राने लक्ष वेधले

0

नवापूर: नंदुरबार जिल्ह्यात ४१ हजार मजुर मनरेगाच्या माध्यमातून काम करत आहेत. नवापूर तालुक्यातील तारापूर येथे सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामाचे ड्रोनने घेतलेल्या छायाचित्राने लक्ष वेधून घेतले. नवापूर तालुक्यात ८ हजारावर आदिवासी बांधव मनेरगावर काम करत आहे. लाँकडाऊनमध्ये त्यांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसुन येत आहे. मजुरांची संख्या वाढत असुन मिळेल त्याला काम मिळत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला आहे.