मनेवल येथे शेतकर्‍याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

0

यावल । तालुक्यातील मनवेल येथील नरेंद्र उर्फ साहेबराव योगराज पाटील (वय 36) या शेतकर्याने मंगळवार 25 रोजी दुपारी शेतातील निंबाचे झाडास गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत येथील पोलीस ठाण्यात दिपक पाटील यांचे खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील मनवेल येथील शेतकरी नरेंद्र उर्फ साहेबराव योगराज पाटील यांनी त्यांचे दगडी शिवारातील शेत गट नं. 61 मधील बांधावरील निंबाचे झाडास दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात येवून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी त्यांचेवर अंत्यसंस्कार केले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. मयत शेतकर्‍यांचे सुमारे 35 जणांचे कुटुंब असून त्यांच्या नावावर शेती नसल्याची माहिती मिळाली. मयत शेतकर्‍याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परीवार आह़े