मनोमय इलेक्ट्रॉनिक्सचे शुक्रवारी ग्रँड ओपनिंग

0

जळगाव । मल्टीब्रँड इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंच्या विविध उत्पादनांची विस्तीर्ण शृंखला मोबाईल व होम अप्लायन्सेसचे भव्य दालन मनोमय इलेक्ट्रॉनिक्सचे ओपनिंग शुक्रवारी 5 जानेवारीला जळगाव येथील नवीपेठेत होत आहे. मनोमय इक्लेटॉनिक्स हे जळगावातील मल्टी स्टोरीड व मल्टी ब्रँडाचे विस्तीर्ण व भव्य दालन आहे. ज्यामध्ये सोनी, सॅमसंग, पॅनासॉनिक, र्व्हर्लपूल, डैकीन, बॉश, एलिका, सिस्का यासारख्या जगविख्यात ब्रँडस्चा समावेश असणार आहे.

विविध ब्रँडस्ची उत्पादने उपलब्ध
विविध ब्रँडस्ची विविध उत्पादने येथे ग्राहकांना सहज उपलब्ध होणार आहेत. ज्यामध्ये टी.व्ही. रेफीरेजट, ए.सी., वॉशिंग मशीन, होम थिएटर, होम अप्लायन्सेस, मोबाईल आदींचा समावेश यात असणार आहे. ही उत्पादने सर्व सामान्यांनाही खरेदी करता यावी म्हणून येथे फायनान्सचा देखील पर्याय उपलब्ध आहे. त्यांना त्याविषयीचे व्यवस्थित मार्गदर्शन करुन त्यांचे निरसन केले जाणार आहे. विशेष म्हणजे ओपनिंगच्या पार्श्‍वभूमीवर पहिल्या एक्कावन्न ग्राहकांना आकर्षक हमखास गिफ्ट दिली जाणार आहे. शोरुममध्येच प्रत्येक उत्पादनाचे डिस्प्ले असल्यामुळे डिस्प्ले पाहून उत्पादन विकत घेण्यासाठी मदत होणार आहे. त्याचप्रमाणे येथील उत्पादन विक्रीपूर्व व विक्री प्रश्‍चात सेवा ही नेहमीच समर्पित असणार आहे. तरी ग्राहकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मनोमय इलेक्ट्रॉनिक्स जळगावचे प्रतिषेक काबरा यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. याप्रसंगी मनोज काबरा, राजेश काबरा उपस्थि होते.