मुंबई : मनोरंजन जगातील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत मनोरंजन उद्योगावरील जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे. अक्षय कुमार, अजय देवगण, करण जोहर, राकेश रोशन, सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख प्रसून जोशी आणि प्रोड्यूसर गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष सिद्धार्थ रॉय कपूर यांचा यामध्ये समावेश होता.
शिष्टमंडळाने मोदींसमोर भारतातील मनोरंजन उद्योग आणि मीडियाच्या विकासाची व्यापक शक्यतांची रुपरेखा मांडली. भविष्यात भारताची पाच ट्रिलियन डॉलर इतकी भक्कम अर्थव्यवस्था बनवण्याच्या मोदींच्या उद्दीष्टाला साध्य करण्यासाठी मनोरंजन क्षेत्र महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते असे शिष्टमंडळाने सांगतले.