मनोहर पर्रीकर बनणार गोव्याचे मुख्यमंत्री

0

नवी दिल्ली ।केंद्रीय संरक्षरमंत्री मनोहर पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री होणार असून त्यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा सुपुर्द केला आहे. तर दुसरीकडे आज पंजाबमध्ये काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. गोव्यात भाजपला स्पष्ट बहुमत नसतांनाही दोन पक्षांच्या कुबड्या घेऊन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर हे सत्ता स्थापन करणार आहे.

16 रोजी शपथविधी
पंजाब काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला असून 16 मार्च रोजी त्यांचा शपथविधी होणार आहे. ड्रग्जविरोधात आपण कठोर भूमिका घेणार असल्याचे आश्वासन अमरिंदर सिंग यांनी प्रचारावेळी दिले होते. त्याला अनुसरुनच त्यांनी आपण पावले उचलणार आहोत असे त्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

पर्रीकर पुन्हा राज्यात
केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची पुन्हा गोव्यात रवानगी होणार आहे. त्महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि फॉरवर्ड गोवा दोन्ही पक्षांनी भाजपबरोबर जाण्याची तयारी दाखवली आहे. यामुळे येथे भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे. अर्थात यासाठी या दोन्ही पक्षांनी मनोहर पर्रीकर हेच मुख्यमंत्री हवेत अशी अट ठेवल्यानेे ते केंद्रातून राज्यात येणार आहेत.