मनोहर पर्रीकर लिलावती रुग्णालयात दाखल

0

मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पुन्हा शुक्रवारी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने ते मुंबईकडे रवाना झाले. काही महिन्यांपासून पर्रीकर यांच्यावर स्वादुपिंडाच्या आजारावर उपचार सुरू आहेत.

मात्र दुसऱ्याच दिवशी उलट्या होऊ लागल्यानंतर लिलावतीमधील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते तत्काळ मुंबईत दाखल झाले. पुढील दोन दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे.बुधवारीच ते अमेरिकेतून उपचार घेऊन गोव्यात परतले होते.