मनोहर वाढोकर स्मृतीप्रित्यर्थ 1270 तरुणांनी केले रक्तदान!

0

वाढोकार ग्रुप ऑफ कंपनीजच्यावतीने केले आयोजन

पिंपरी : वाढोकार ग्रुप ऑफ कंपनीजच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तरुणांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये तब्बल 1270 तरुणांनी रक्तदान केले. स्व. मनोहर वाढोकार यांच्या 9 व्या स्मृतिदिनानिमित्त या शिबिराचे आयोजन चिंचवड येथील रोटरी क्लब येथे करण्यात आले होते. गतवर्षी एकूण 1050 जणांनी रक्तदान केले होते. या रक्तदान शिबिरात संकलित केलेले रक्त आर्मी रुग्णालय, आदित्य बिर्ला रुग्णालय, सह्याद्री हॉस्पिटल, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, डी. वाय. पाटील रुग्णालय, पिंपरी सेरॉलॉजिकल येथील रक्तपेढ्यांमध्ये देण्यात आले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी श्रीकांत वाढोकार, सुमीत वाढोकार, सुशील वाढोकार, शैलेश शेगोकार, उमेश शेगोकार, गौतम डोळस, अखिल त्रिपाठी, अरुण मेटंगे, अजित रोहोकले आदींनी विशेष परिश्रम घेतले.