मन्यारखेडा धरणात प्रौढाचा बुडून मृत्यू

0
जळगाव – पोहण्यासाठी गेलेल्या 58 वर्षीय व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास मन्यारखेडा तलावात घडली. या घडनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत नशिराबाद पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तुकाराम तानकु भिल (अहिरे) (वय-58) रा. मन्यारखेडा हे सकाळी 10ते 11 वाजेच्या सुमारास येथून जवळ असलेल्या मन्यारखेडा धरणावर पोहण्यासाठी गेले. यात त्यांना पाण्याचा अंदाज न अल्याने त्यांचा बुडत असल्याचे त्याठिकाणी धुणे धुणारी महिलेच्या लक्षात आल्यानंतर परीसरात नागरीकांनी धाव घेतली. त्यांना पाण्यातून बाहेर काढले असता त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पोलीस पाटील भ्रतसिंग पाटील यांच्या खबरीवरून नशिराबाद पोलीसात गु.र.नं.  21/2018 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून प्राथमिक तपास नामदेव ठाकरे हे करीत आहे.