मन्सुरी जमाअतने उच्चशिक्षणाकडे लक्ष द्यावे

0

शहादा : दोंडाईचा येथे मन्सुरी जमाअतर्फे नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील मन्सुरी जमाअतचे हुद्देदार व प्रतिनिधींचा मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात सरकार साहेब रावल म्हणाले की, दोंडाईचा येथील मन्सुरी जमाअत व्यापार धंद्यात पुढे आहे परंतु उच्च शिक्षणात मागे आहे. त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याकडे लक्ष द्यावे. माझ्या मुलाला शिक्षणासाठी परदेशी पाठवले तो शिक्षित असल्यामुळे लोकांनी तीन वेळा आमदार म्हणून निवडून दिले. तो आज कॅबिनेट मंत्री असून नंदूरबार जिल्ह्याचा पालक मंत्री सुद्धा आहे.

दोंडाईचा नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सरकार साहेब यांच्या नेतृत्वामुळे भाजपाला भरघोस यश मिळाले तसेच मन्सुरी जमाअतचे दोन नगरसेवक निवडून आल्यामुळे औचित्य साधून मेळाव्यात त्यांचे सत्कार करण्यात आले. मेळाव्याचे अध्यक्ष शहादे येथील डॉ.जाकिर हुसेन एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष शेख अख्तर मन्सुरी होते. दोंडाईचा मन्सुरी जमाअचे अध्यक्ष मोहीयोद्दीन यांनी पाहुण्यांचे फुलहारने स्वागत केले. सदरप्रसंगी शेख युनुस मन्सुरी, आरीफ मन्सुरी, बबलू मन्सुरी, लतीफखा मन्सुरी, नईम आजाद, शफी मन्सुरी, फकीरा मन्सुरी, इस्माईल मन्सुरी, हाजी शब्बीर मन्सुरी, नबु मन्सुरी, युसुफ मुसा यांनी मनोगत व्यक्त केले. युसूफ मुनीर मन्सुरी यांनी मेळाव्याचे सुत्रसंचालन केले. तसेच सर्वांचे आभार मानले.