‘मन की बात’: सप्टेंबर महिना ‘पोषण महिना’ म्हणून होणार साजरा

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज रविवारी ३० रोजी ६८ वा ‘मन की बात’ पार पडला. यात त्यांनी संपूर्ण देशवासीयांशी संवाद साधला. आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ च्या केंद्रस्थानी लहाने मुले होते. लहान मुलांची मानसिकता मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे.

लहान मुलांच्या खेळणी तयार करण्याच्या उद्योगात भारताचा वाटा कमी आहे. ७ कोटींचा जागतिक खेळणी उद्योग असून त्यात भारताचा वाटा कमी आहे. तो वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी लहान मुलांच्या खेळण्यांचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न देशातील नवीन उद्योजकांनी करावे, खेळणी तयार करण्याचे उद्योग सुरु करावे, त्यातून आत्मनिर्भरच्या दृष्टीने पाऊल टाकता येईल. नवीन स्वदेशी खेळणी तयार करून देशाला आत्मनिर्भर करण्याचे आवाहन मोदींनी केले.

लहान मुलांचे आरोग्य आणि मानसिकतेवर भर देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच सप्टेंबर महिना हा देशभरात पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल. राष्ट्र आणि पौष्टिकतेचे खूप चांगले नाते आहे. आपल्यात एक म्हण आहे – ‘ यथा अन्नम तथा मन्नम’ म्हणजे जसे आपले अन्न असते, त्या प्रमाणे आपला मानसिक आणि बौद्धिक विकास होतो.

पोषण महिन्यात MyGov portal वर एक food and nutrition quiz चे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मीम्स competition भी करण्यात येणार आहे. तुम्ही स्वत: यात सहभागी होऊ शकता किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींना सहभागी होण्यास प्रेरित करु शकता….

पोषण किंवा न्यूट्रिशन याचा अर्थ असा नाही की आपण काय खात आहात, आपण किती खात आहात, किती वेळा आपण खात आहात. याचा अर्थ आपल्या शरीराला किती आवश्यक पोषक आहार मिळत आहे, हा आहे