डमडम: लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान बाकी आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसमधील संघर्ष अगदी टोकाला पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोमध्ये प्रचंड राडा झाला. यानंतर जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली.दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील डमडम येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. ममता दीदी ऐकून घ्या, पश्चिम बंगाल तुमची आणि तुमच्या पुतण्याची जहागिरी नाही, भारत मातेचा हा एक अंग आहे, अशा शब्दात मोदींनी ममता बनर्जी यांना दम दिला.
ममता दीदी तुम्हाला पंतप्रधान पदाचा स्वप्न पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र देशाच्या सुरक्षा रक्षकांविरोधात गुंडाचा वापर तुम्ही करत असल्याने तुमच्या विश्वसनीयतेवर शंका असल्याचा टोला मोदींनी लगावला.